अरबाज खानची आज चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

ठाणे - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याला आज ठाणे पोलिसांनी समन्स बजावला. देशातील बडा सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात अरबाज होता. त्याने एका क्रिकेट सामन्यात सोनूसोबत सट्टा खेळल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला चौकशीसाठी शनिवारी ठाणे पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे. 

सोनूला चार दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज अरबा ला समन्स बजावले. त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. अरबाज हा आपल्या संपर्कात असल्याची माहिती सोनूने दिली होती. त्याने क्रिकेट सामन्यांसाठी अनेकदा सट्टा लावला होता; मात्र त्याचे पैसे त्याने दिले नसल्याची माहिती सोनूने तपासकर्त्यांना दिली. याच माहितीची खातरजमा करण्यासाठी अरबाजला समन्स बजावल्याचे कोथमिरे यांनी सांगितले. 

Web Title: bollywood actor Arbaaz Khan's inquiry today