बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला कॅन्सर; कोरोना निगेटिव्ह पण वेगळ्याच आजाराचे निदान

sanjay dutta
sanjay dutta

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर त्याची कोरोना टेस्टही केली होती. आता मंगळवारी अचानक संजय दत्तने सोशल मीडियावरून आपण काही काळासाठी चित्रपटातून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. 

संजय दत्त आता पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याचं समजतं. सध्या त्याच्या आजाराबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे किंवा त्याच्यावर उपचार होऊ शकतात की नाही याची माहिती समजू शकलेली नाही. संजय दत्तची पत्नी आणि दोन्ही मुले सध्या दुबईत आहेत. 

सोमवारी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर संजय दत्तने आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत असं सांगत लवकरच कामावर परतणार असल्याचं म्हटलं होतं. संजय दत्तने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, नमस्कार मित्रांनो, सध्या वैद्यकीय उपचार सुरु असल्याने काही काळ कामापासून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबिय आणि मित्र सोबत आहेत. माझ्या सर्व शुभचिंतकांनी काळजी करू नका आणि कोणत्याही अफवा पसरवू नका. तुमची प्रार्थना आणि प्रेम यामुळे मी लवकरच परतेन. 

संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. lतेव्हा त्याची कोरोना चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. खुद्द संजय दत्तने शनिवारी सोशल मीडियावर माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही चाचण्या बाकी आहेत आणि आपण लवकरच घरी परतणार आहोत असे सांगितले होते. आज त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com