
Mumbai News : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडवण्याची धमकी
मुंबई - मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बनं उडण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बीकेसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता धीरूभाई अंबानी शाळेच्या लँडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमच्या शाळेत टाईम बॉम्ब ठेवला असल्याचे सांगून कॉलरने कॉल कट केला.
धमकी मिळताच प्रकरण गंभीर असल्यामुळे तससेच पूर्वी सुद्धा अंबानी कुटुंबाला अनेकदा धमक्या देण्यात आल्यामुळेच धीरूभाई अंबानी शाळेने यासंदर्भात पोलिसांना कळवले. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बनं उडवण्याच्या धमकीच्या कॉलनंतर आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, बीकेसी पोलिसांनी अज्ञात कॉलर विरुद्ध भादंवि कलम 505 (1) (बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या पोलिसांनी माहिती प्रमाणे आरोपीची ओळख पटली असून लवकरच पोलीस त्याला अटक करणार आहेत.