मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला धक्का, पालिका करणार कारवाई?

पूजा विचारे
Thursday, 21 January 2021

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिला आहे. सोनू सूदनं मुंबई पालिकेच्या नोटीसविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयानं झटका दिला आहे. सोनू सूदनं मुंबई पालिकेच्या नोटीसविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेत्याला दिलासा देण्यास नकार दिलाय. मुंबई पालिकेनं सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेनं जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पालिकेनं दावा केला होता की, सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केली आहे. अवैध बांधकामावर पालिकेकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता.

पालिकेच्या या नोटीसला अभिनेत्यानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यापूर्वी न्यायालयानं मुंबई पालिकेला १३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकरची कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज सोनू सूदने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर  मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचा कारवाई करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेनं सोनूविरोधात जुहू पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा-  IND vs AUS: मायदेशी परतलेल्या टीम इंडियाला स्पेशल सूट

Bombay High Court dismisses Sonu Sood petition challenging BMC notice illegal construction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay High Court dismisses Sonu Sood petition challenging BMC notice illegal construction