भोसरी जमीन प्रकरण: एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा, 'या' तारखेपर्यंत कारवाई नाही

भोसरी जमीन प्रकरण: एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा, 'या' तारखेपर्यंत कारवाई नाही

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने ८ मार्चपर्यंत दिलासा दिला आहे.  बुधवारची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत एकनाथ खडसेंचा अटकेपासूनचा दिलासा कायम राहिला आहे. भोसरी जमीन प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

तपासात सहकार्य न केल्यास ईडीकडून अटकेची कारवाई केली जाऊ शकते अशी भीती खडसे यांच्या वतीने व्यक्त केली होती. अटकेच्या भीतीने एकनाथ खडसेंनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  ईडीने बजावलेले समन्स विरोधात खडसेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली समन्स रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे त्यांनी केली होती. आज या याचिकेवर सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. ८ मार्चपर्यंत न्यायालयाकडून खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले होते.  याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सहा तास चौकशी केली. 

Bombay High Court has granted relief NCP leader Eknath Khadse till March 8 Bhosari land case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com