बेस्ट कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारले

Mumbai High Court
Mumbai High Court

मुंबई : तुम्हाला चर्चा नको, संप पण मागे घ्यायचा नाही. महापालिका-सरकार चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही नाही, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारले. 

बेस्टने संप मागे घ्यावा आणि वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका मांडली, मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. संपाबाबत दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचं सांगत बेस्ट कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. संपावर कायम राहून तडजोडीची चर्चा करणे योग्य नाही. बेस्ट संपाबाबत होणाऱ्या सुनावणीला महाधिवक्त्यांनी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाने संपावर नाराजी व्यक्त करताना तुम्हाला नेमके काय हवे आहे. तुम्हाला चर्चा करायची नाही आणि संपही मागे घ्यायचा नाही अशी विचारणा केली. शुक्रवारी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हाल अशी अपेक्षा होती असेही यावेळी न्यायालयाने सांगितले. गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. अद्याप या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com