वरळीनंतर जुहूतल्या पबवर कारवाईचा बडगा, मुंबई पालिकेची कारवाई

वरळीनंतर जुहूतल्या पबवर कारवाईचा बडगा, मुंबई पालिकेची कारवाई

मुंबई: मुंबईत मध्यरात्री पर्यंत सुरू असलेल्या जुहूतील पबवर मुंबई पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. अंधेरीच्या के वार्डानं ही कारवाई केली असून पालिका अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

जुहूतील प्रसिद्ध क्लब R ADDA आणि पब 'बैरल मेंशन' यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मध्यरात्री २ वाजेपर्यंत पबमध्ये तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी होती. कोविड नियमांचे उल्लंघन झाले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

अगोदरपासून पब आणि हॉटेल यांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. वरळी येथे कारवाई झाली त्यानंतर आता जुहू येथे देखील कारवाई केली जाईल. 

मास्क असेल किंवा नियम पाळले गेले नाहीत तर कारवाई केली जाणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. 

जे लग्नाचे नियम पाळले जाणार जाणार नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई गेली जाईल. तसंच येथून पुढे कारवाई कडक केली जाणार असल्याचा इशाराही अस्लम शेख यांनी दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत नाईट क्लबमध्ये तुफान गर्दी झाली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टी सुरु होती. वरळीतील कमला मिलमधील सर्व पब मध्ये गर्दी झाली होती. त्यानंतर मनसे नेते संतोष धुरी यांनी एका पबमधील गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 

हेही वाचा- काळजी घेण्याची गरज, मुंबईत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या पार 
त्यानंतर आदित्य ठाकरेंनी या व्हिडिओची दखल घेत वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली.

Bombay Municipal Corporation taken action against Juhu pub open till midnight

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com