‘बाँब फेकणाराच दहशतवादी असतो का?’ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

केवळ बाँब फेकणाराच दहशतवादी असतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आणि कटकारस्थान करणारेही जबाबदार असतातच, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्याविरोधातील काही पुराव्यांबाबत अधिक तपास होणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

मुंबई - केवळ बाँब फेकणाराच दहशतवादी असतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आणि कटकारस्थान करणारेही जबाबदार असतातच, असे मत शुक्रवारी व्यक्त केले. शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्याविरोधातील काही पुराव्यांबाबत अधिक तपास होणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

नवलखा यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून, उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला.  कोरेगाव- भीमा प्रकरणानंतर पोलिसांनी नवलखांसह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is the bomber the only terrorist High Court