बाबूजींच्या तानपुऱ्यातून येणारा एकमेव सूर म्हणजे सावरकर!

बाबूजींच्या तानपुऱ्यातून येणारा एकमेव सूर म्हणजे सावरकर!
बाबूजींच्या तानपुऱ्यातून येणारा एकमेव सूर म्हणजे सावरकर!

मुंबई : दादर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात नुकताच ‘सुधीर फडके कृतज्ञता ग्रंथा’चा प्रकाशन सोहळा पार पडला. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक व सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. 

‘बाबूजींची ओळख आपल्या सर्वांनाच एक गायक, संगीतकार अशी आहे, परंतु बाबूजींच्या तानपुऱ्यातून सदैव झंकारणारा, जाणवणारा, ऐकू येणारा एकमेव सूर म्हणजे सावरकर आणि सावरकरच होता. आपले संपूर्ण आयुष्य ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना समोर ठेवूनच जगले’, असे प्रतिपादन या वेळी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.

सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा इदाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते. व्यासपीठावर सुधीर फडकेंचे पुत्र गायक, संगीतकार श्रीधर फडके, सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रा फडके आणि रवींद्र साठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्रीधर फडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com