बोर्डी - पोलिस ठाण्यासाठी हक्काची इमारत लवकर व्हावी

अच्युत पाटिल
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बोर्डी - पालघर पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील घोलवड पोलिस ठाण्याच्या कार्यालयाच्या प्रस्तावीत इमारतीसाठी जमीन मिळत नसल्याने पोलिस ठाण्याचा कारभार छोटाश्या भाडोत्री जागेत करावा लागत आहे. पुरेशी जागा नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना गैरसोय सोसावी लागत आहे. पोलिस ठाण्यातंर्गत समावेश असलेल्या घोलवड आणि बोर्डी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जमिन मिळावी अशी मागणी पोलिस अधीक्षक कार्यालयातून करण्यात येत आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

ग्रामस्थांच्या मागणिचा गांभिर्याने विचार करून 1992 मध्ये बोर्डी परिसरातील 19 गावांसाठी पोलिस निरीक्षक दर्जाचे ठाणे मंजुर करण्यात आले.

सुरवातीला आउट पोस्ट असलेल्या भाडोत्री जागेतच पोलिस ठाण्याचा कारभार सुरु करण्यात आला. परंतु, वाढता कारभार लक्षात घेऊन पोलिस ठाण्यासाठी सर्व सुविधानी उपलब्ध असलेली ईमारत बांधण्याचा प्रस्ताल मंजुर झाल्यानंतर गेली पंचविस वर्षे पोलिस खाते जमिनिच्या शोधात आहे. मात्र पोलिस ठाणे आणि पोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षा बाळगणाऱे तथाकथीत नेते मात्र पोलिस ठाण्याच्या ईमारतीसाठी जमिन देण्यास अनकूल नसल्याने. जमिन देता का जमिन अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.

एकावन्न चौरस किलोमिटर परिसराती 19 गावं,140 पाडे,16 किलोमीटर संवेदनशील समुद्र किनारा, चौसष्ट हजार लोकवस्ती असलेल्या परिसरातील झाई, बोर्डी गावाला पर्यटन क्षेत्र, हजारोच्या संखेने विद्यार्थी असलेल्या पाच माध्यमीक, व तीस प्राथमीक शाळा, एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तीन कनिष्ठ माध्यमीक विद्यालयं, एक तंत्रशिक्षण महाविद्यालय, एक विज्ञान महाविद्यालय, एक मशिद, एक मदरसा, सहा मंदिरं, एक धरण, पोलिस  ठाण्याच एक विज्ञान महाविद्यालय, एक मशिद, एक मदरसा, सहा मंदिरं, एक धरण, पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. 

तर उत्तरेला गुजराज राज्याची हद्द आणि पश्चिमेला संवेदनशिल समुद्र किनारा व पुर्वेला सह्याद्रिच्या पर्वतरांगा अशी भौगोलीक परिस्तिती असुन यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलिस निरिक्षक,एक उप पोलिसनिरिक्षकाच्या हाताखाली एकावन्न पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

12 मार्च 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिका आणि 26-11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर बोर्डी परिसरातील समुद्र किनारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्याच प्रमाणे दमण, सिल्व्हासा येथून गुजरात राज्यातुन चोरट्या मार्गाने होणारी दारुची वाहतूक पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. पोलिसांना आवशक सुविधा उपलब्ध झाल्यास सुरक्षा व्यवस्था सबळ करणे शक्य आहे.

Web Title: Bordi - The building police station should be done soon