बोर्डी ः बोर्डी, घोलवडमध्ये रविवारी पहाटे पाच ते सकाळी साडेआठपर्यंत बेसुमार बरसलेल्या मेघराजाने परिसर जलमय करून टाकला आहे. गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. तलाव, विहिरी तुडुंब भरले आहेत.
अनेक वर्षांनंतर पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही उल्लेखनीय असल्याचे बोलले जाते आहे. त्यातच आज पहाटे पाच ते साडे आठदरम्यान धो-धो बरसलेल्या पावसामुळे बोर्डी, घोलवड गावात पाणीच पाणी झाले आहे.
बोर्डी गावातील वहिंद्रा धुंदिया वाडी, घोलवड गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि भाजी मार्केट तसेच सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरले. सकाळच्या वेळी कामाला जाणाऱ्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. काही काळ वाहतूकही धीमी झाली होती. दरम्यान, साडेआठनंतर पावसाने उघडीप दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.