बोर्डीत पाणी टंचाई

अच्युत पाटील
बुधवार, 27 जून 2018

बोर्डी -  बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील वाँर्ड क्रमांक एक मधील भरवाड पाडा भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

मागील दोन महिन्यापासून भरवाड पाडा भागात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी नादुरूस्त झाल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे अशी तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे. ग्रामपंचायत या कामी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. पाड्यावर नळाला पाणी येत नसल्याने तेथील महिलांना धुंडिया पाडा येथुन एक किलोमीटर अंतरावर पाणी घेण्यासाठी भाडोत्री टेम्पो सह जावे लागत आहे.

Web Title: bordi has a water shortage