जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती

अच्युत पाटील
मंगळवार, 27 मार्च 2018

बोर्डी - जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्यावर पालघर जिल्हा अंतर्गत मंगळवार, 27 मार्च रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बोर्डीच्या कॅम्पिंग ग्राउंड येथे केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे हे  कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या वेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, समाजसेवक महादेव सावे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमापूर्वी पंचक्रोशीतून रॅलीचे काढण्यात आली.  या वेळी रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये ज्योती वांगड यांनी टीबी जनजागृतीबाबत, अर्चना खोत बेटी बचाव तर, स्वच्छ भारताची रांगोळी रेखाटणाऱ्या भारती राऊत यांचा समावेश होता. 

केंद्र शासनाचा कायाकल्प पुरस्कार प्राप्त घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमला देखील यावेळी गौरविण्यात आले. प्रस्ताविकातून स्मिता बारी यांनी क्षयरोग दिनाचे महत्व विशद करून वार्षिक कामाचा  आढावा मांडला. या वेळी ही मोहिम राबवताना आलेले अनुभव जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचार्यांनी सांगितले.  

शेवटच्या घटकापर्यंत पोहचून उपचार मिळावेत या करिता प्रयत्न करण्याचे आवाहन विजय खरपडे यांनी आरोग्य व आशा कर्मचाऱ्यांना केले. या रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक शपथ घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली

Web Title: bordi palghar world tb day spcedial