बाटलीबंद पाणी विक्रेत्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - बाटलीबंद पाणी बेकायदा विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शेकडो पाणीविक्रेते या मोर्चात सहभागी झाले.

"आयएसआय'चे मानांकन नसलेल्या कंपन्यांमार्फत बेकायदा पाणीविक्री सुरू आहे. या कंपन्यांनी "एफडीए'कडून परवानगी घेतलेली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. परवानाधारक कंपन्यांचा व्यवसाय धोक्‍यात आल्याने महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनने गुरुवारी दुपारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी एफडीए कार्यालयाजवळ अडवला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Web Title: bottle close water sailer rally