गुप्तांग कापलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

डोंबिवली :  तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर वारंवार मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करतो. इतकेच नाही तर आपले महिलेवर प्रेम असल्याचे थेट या तरूणाने तिच्या पतीलाच सांगितले. या सर्व प्रकारामुळे  संतप्त झालेल्या एका महिलेने एका 30 वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग  कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा चार दिवसांनंतर मृत्यू झाला आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. 
 
तुषार पूजारे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याला हल्ला करणारी महिला डोंबिवलीतील नांदीवली गावात राहते. तरुणाच्या त्रासाला कंटाळून या महिलेने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. यासाठी  तीने याच परिसरातील एका मोकळ्या निर्जन स्थळी बोलावले व आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तरुणाचे गुप्तांग कापले होते. प्रथम तुषारला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळीच जखमी तरुणाची स्थिती गंभीर असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अखेर चार दिवसांनंतर तुषारचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेसह मित्र प्रतीक कनोजीया आणि तेजस म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

छेड काढणाऱ्या तरूणाचे डोंबिवलीमध्ये गुप्तांगच कापले

Web Title: Boy died whose Penis Cuts Off by Woman In Dombivali