सूर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

File Photo
File Photo

मनोर : माकडचोळा हद्दीत सूर्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या तीन तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सूर्या नदीच्या पात्रात आतापर्यंत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

आरिफ अब्दुल रशीद चौधरी (१८) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला आरिफ साध्य बोईसर पूर्वेच्या टाटा हौसिंगमध्ये वास्तव्यास होता. मित्रांसोबत शनिवारी (ता.१६) दुपारच्या वेळेस माकडचोळा येथे नदीतपात्रात पोहत असताना आरिफचा मित्र खोल पाण्यात बुडू लागला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आरिफ पाण्यात बुडाला.

आरिफला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला; परंतु मदत उपलब्ध होण्याआधी आरिफचा बुडून मृत्यू झाला. बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची शोधमोहीम राबवली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आरिफचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com