लिफ्टमध्ये पाय अडकून मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

स्केटींग शुज घालून लिफ्टमधून जात असलेल्या मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्याने जखमी झाल्याची घटना घडली.

ठाणे : स्केटींग शुज घालून लिफ्टमधून जात असलेल्या मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्याने जखमी झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास फ्लॉवर व्हॅली गृहसंकुलातील सहाव्या क्रमांच्या इमारतीमध्ये वेद मिलिंद येवले (8) असे याचा डावा पाय लिफ्टमध्ये अडकला.

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून 25 ते 30 मिनीटांच्या प्रयत्नाने या मुलाचा पाय बाहेर काढला. वेदच्या पायाला दुखापत झाली आहे. असून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

इमारतीच्या लिफ्टमध्ये रात्री पावणेआठच्या दरम्यान वेद स्केटींग शुज घालून शिरत होता. तेव्हा, लिफ्टचा अंदाज न आल्याने आणि स्केटींग बुटमुळे घसरून त्याचा पाय लिफ्टमध्ये अडकला. स्थानिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर त्याचा पाय बाहेर काढला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy injured in leg lift