ट्रकच्या धडकेत मुलगा ठार; वडील जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

स्कूटरला पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने 24 वर्षीय तरुण जागीच ठार; तर त्याचे वडील जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. 

पनवेल : स्कूटरला पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने 24 वर्षीय तरुण जागीच ठार; तर त्याचे वडील जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. 

या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव विशाल दत्तात्रय भोईर (24) असे असून तो रोहा येथील धाटाव भागात आई-वडील व भावंडासह राहत होता. मंगळवारी सकाळी दत्तात्रय भोईर त्यांचा मुलगा विशालसह तळोजा एमआयडीसीतील कंपनीमध्ये विशालच्या नोकरीकरिता कागदपत्रे देण्यासाठी आले होते. कागदपत्रे दिल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दोघे पिता-पुत्र हेल्मेट घालून स्कूटरवरून रोहा येथे जाण्यासाठी निघाले होते. 

या वेळी त्यांची स्कूटर कळंबोली सर्कल येथील चौकात आल्यानंतर सिग्नल लागल्याने दत्तात्रय भोईर थांबले होते. सिग्नल सुटल्यानंतर ते आपली स्कूटर घेऊन निघाले असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या वेळी विशालच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तो काही वेळातच मरण पावला. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रकचालक जगधारी बालरूप चौहाण याला पकडून कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy killed in truck collision; The father was injured