‘सकाळ’मुळे रुग्णाला संजीवनी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुंबई - औरंगाबादमधील सुदर्शन आंभोरे या मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाविषयीची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर काही हजारांची मदत त्याला मिळाली होती. जगभरातून आलेल्या या मदतीमुळे सुदर्शनच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सकाळ माध्यम समूहाने केलेल्या मदतीची जाणीव ठेवून सुदर्शन आणि त्याचे वडील भीमराव आंभोरे यांनी बुधवारी (ता. १६) ‘सकाळ’च्या परळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आभार मानले. 

पुण्यातील खासगी रुग्णालयात सुदर्शनवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर काही महिन्यांतच त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. खासगी रुग्णालयातील उपचारांच्या खर्चामुळे या कुटुंबावर अर्धे घर, दागिने विकण्याची पाळी आली. नाकातून रक्त येत असल्याने सुदर्शनला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवनदायी योजनेतून मिळणारी मदत संपल्यानंतर सुदर्शनच्या कुटुंबीयांसमोर त्याच्या उपचारांचा मोठा प्रश्‍न उभा राहिला. हातातोंडाचीही गाठ पडेनाशी झाली. सुदर्शनची आई आणि त्याच्या १८ वर्षांच्या विशेष गरज असलेल्या बहिणीला सांभाळताना उपचारांचा खर्च उचलताना त्याच्या वडिलांचा जीव मेटाकुटीस आला. 

त्यांनी ‘सकाळ’चे परळमधील कार्यालय गाठले. समाजाच्या दानशूरतेविषयी त्यांना विश्‍वास होता. त्यांच्या या परिस्थितीविषयीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. मदतीचा ओघ सुरू झाला. ‘सकाळ’मधील काही कर्मचाऱ्यांनीही त्यांना आर्थिक मदत केली. त्यातून सुदर्शनवर उपचार करण्यात आले. ‘सकाळ’च्या मुंबई, पुणेसह इतर आवृत्त्यांतही बातमी प्रसिद्ध झाली होती. राज्यभरातून मदत मिळाली. ‘सकाळ’ने केलेल्या या मदतीची जाणीव ठेवून सुदर्शन व त्याच्या वडिलांनी कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून आभार मानले. 

हाताला हवे आहे काम...

सुदर्शन आंभोरे हा बारावी शिकलेला तरुण आहे. आजारी पडण्यापूर्वी त्याने संगणक प्रशिक्षण आणि दुरुस्तीचे काम केले आहे. शेतातही काम केले होते. आजारानंतर आता त्याच्या काम करण्यावर बंधने आली आहेत. शक्‍य होईल असे काम मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

Web Title: BR ambhore has thanked employees of the sakal

टॅग्स