ब्रॅंडडे पान खाये अलिबाग हमारो

चाॅकलेट विडा
चाॅकलेट विडा

अलिबाग : एकेकाळी छोटी कौलारू घरे, लहान दुकाने असलेले अलिबाग नजीकच्या काळात पर्यटन व्यवसायामुळे कात टाकत आहे. विशेष म्हणजे त्याचे प्रतिबिंब आता पानाच्या दुकांनांमध्येही उमटत आहे. गेल्या दोन - तीन वर्षांत या शहरात चक्क ब्रॅंडेड पानाची दुकाने सुरू झाली आहेत. या अलिशान दुकानांत 15 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंतचे पान मिळते. 

विड्याची पाने आणि सुपारीसाठी अलिबाग प्रसिद्ध आहे. त्यामुळे विड्याच्या संस्कृतीची मुळे खोल रुजली आहेत. त्यामुळेच शहरात नाक्‍यानाक्‍यावर हमखास पानाच्या टपऱ्या नजरेस पडतात. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने शहरात सरकारी कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत.

यामधील कर्मचारीही पानाच्या टपऱ्यांवर हमखास दिसतात. आता पर्यटन व्यवसायामुळे; तर या टपऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे या व्यवसायातील संधी हेरून काही ब्रॅंडेड पानांची विक्री सुरू झाली आहे. त्याचे चकाचक स्टॉल दिवसरात्र सुरू असतात. या दुकानांनी तंबाखुमुक्त पानाचे प्रकार ठेवले असून ते आबालवद्धांच्या पसंतीस उतरण आहेत. 

अलिबागमध्ये 5 वर्षांपूर्वी 25 पानाची दुकाने होती. ती संख्या आता 45 झाली आहे. मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी असते, असे पानविक्रेते कृष्णा पुजारी यांनी सांगितले आहे. 

ग्राहकांच्या पसंतीनुसार ब्रॅंडेड पान दुकानात आहेत. त्याचा आस्वाद स्थानिकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात घेत आहेत, असे "मस्त बनारसी पान'चे मालक निखील पालकर यांनी सांगितले. 
बनारसी साधा पानापासून ते फस्ट नाईट पान अशा एकूण 70 ते 80 प्रकारचे पान दुकानात आहेत. त्यांची किंमत 15 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत आहे. फायर पान आणि चॉंकलेट पानाला अधिक पसंती आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दररोज चार हजारांचा व्यवसाय 
बदलत्या ट्रेंडमुळे मस्त बनारसी पान आणि केशरी तारा पान या वातानुकूलित दुकानामध्ये मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय ग्राहक पान खाण्यासाठी येतात. संध्याकाळच्या सुमारात प्रचंड गर्दी असते. दिवसाला तीन ते चार हजार रुपयांचा व्यवसाय होतो. सुट्टीच्या हंगामात शनिवार व रविवारी पर्यटकांसह स्थानिकांची गर्दी असते. 

असे आहे चॉकलेट पान 
कलकत्ता पानावर चॉकलेट थर लावला जातो. नारळ किस, चॉकलेट सुपारी असे गोड पदार्थ त्यामध्ये असतात. या पानाची घडी करून ते फ्रीजमध्ये दोन तास ठेवण्यात येते. त्यानंतर पातळ चॉकलेटमध्ये ठेवून हे पान तयार होते. 
 
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चॉकलेट पान, फायर पान मिळत होते. अलिबागमध्ये असे पान देणारे दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पानांचा आस्वाद या शहरातही घेता येतो. 
- सचिन आसरानी, ग्राहक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com