esakal | ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम

बोलून बातमी शोधा

ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम}

भात कापणी संपली की, रायगड जिल्ह्यातील साजगाव, आवास, वरसोली यासारख्या अनेक मोठ मोठ्या यात्रांचा हंगाम सुरू होतो.

ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम
sakal_logo
By
प्रमोद जाधव

अलिबाग : भात कापणी संपली की, रायगड जिल्ह्यातील साजगाव, आवास, वरसोली यासारख्या अनेक मोठ मोठ्या यात्रांचा हंगाम सुरू होतो. यामध्ये सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल होते. यातून स्थानिक व्यवसायिकांसह, एसटी महामंडळ आणि अन्य व्यवसायिकांना मोठा फायदा होतो. परंतु यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते; अहमद पटेल यांच्या निधानावर राज ठाकरेही हळहळले

रायगड जिल्ह्यातील यात्रांची ख्याती राज्यात आहे. मुंबई, ठाण्यातील भाविक तर या ठिकाणी हमखास हजेरी लावतात. खालापूर तालुक्‍यातील साजगावची यात्रा तर तब्बल 15 दिवस असते. अलिबाग तालुक्‍यातील आवास येथील यात्रा दोन दिवस, तर वरसोली येथील यात्रा पाच दिवस असते. या कालावधीत यात्रांमध्ये देवदर्शनासह फिरण्यासाठीदेखील भाविक व पर्यटक येतात. लाखोच्या संख्येने या कालावधीत भाविक व पर्यटक यात्रांना भेटी देतात. 

हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर धडकणार; मराठा ठोक मोर्चांचा इशारा 

या यात्रांमधून ग्रामपंचायतीला कर मिळतो. तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसह वस्तू, साहित्यांच्या खरेदीतून स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळतो. खेळणी, घरगुती साहित्य, हार, फुले, खाद्य पदार्थ, आकाश पाळणे, विविध प्रकारचे खेळ या कालावधीत भरविले जातात. खाद्य पदार्थ्यांसह अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. यातून सुमारे 25 कोटीहून अधिक उलाढाल होते. यंदा आठ महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साजगाव, आवास, वरसोली येथील यात्रा रद्द केल्या आहेत. यात्रा रद्द असल्याने कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक व्यवसायिकांना या कालावधीत मोठी आशा होती. 

कोरोनाची दुसरी लाट येणार आहे. त्यामुळे सरकारच्या आदेशानुसार मोठी गर्दी होईल, अशा कार्यक्रमांना परवानगी नाही. यात्रांमुळे हजारो, लाखोच्या संख्येने गर्दी होत असेल, तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करीत यात्रा साध्या पध्दतीने साजरे करावेत. जेणेकरून कोरोनावर मात करण्यास मदत होईल. 
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी - रायगड 

वरसोली येथील यात्रेची परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. या यात्रेतून वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थ ग्राहक खरेदी करतात. यातून कोट्यावधीची उलाढाल होते. परंतु यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायिकांबरोबर वस्तू व साहित्य खरेदी करणाऱ्या नागरिकांनाही बसणार आहे. 
- मिलींद कवळे,
उपसरपंच, वरसोली ग्रामपंचायत 

A break in the 25 crore turnover of rural yatras Corona effect in Raigad district 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )