घरकुल बांधू इच्छिणाऱ्यांना सिडकोची साथ; नवी मुंबईत 106 निवासी भूखंड विक्रीला

सुजित गायकवाड
Thursday, 11 February 2021

नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतके निवासी भूखंड सिडकोकडून विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहेत.

नवी मुंबई  : नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतके निवासी भूखंड सिडकोकडून विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड बंगलो, रो-हाउस आणि निवासी इमारतींकरिता असतील. यामुळे स्वः मालकीचे घर बांधू इच्छिणाऱ्या नागरिक, विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. 

या योजने अंतर्गत नवीन पनवेलमधील 28, खारघर येथील 15, नेरूळ येथील 12, घणसोली येथील 38 आणि ऐरोली येथील 13 असे एकूण 106 भूखंड सिडकोकडून विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व भूखंड हे केवळ निवासी वापराकरिता आहेत. या भूखंडांकरिता ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे अर्ज मागविण्यात आले असून अर्ज नोंदणी, निविदा सादर करणे, अनामत रक्कम व शुल्क भरणा इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. 
योजनेच्या अर्ज नोंदणीस 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. ई-निविदा प्रक्रिया 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 1 मार्च 2021 रोजी सायंकाळी 17 वाजता संपेल. ई-लिलाव प्रक्रिया 3 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 3 मार्च 2021 रोजी सायंकाळी 17 वाजता संपणार आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, नवी मुंबईमध्ये मनासारखे बंगलो, रो-हाउस बांधण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेमुळे शहरातील बांधकाम क्षेत्रालाही नवचैतन्य प्राप्त होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. 

असा करा अर्ज - 
योजनेची सविस्तर माहिती आणि भूखंडांचा तपशील जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. 

शहरे भूखंड 
नवीन पनवेल - 28 
खारघर 18 
नेरूळ 12
घणसोली 38 
ऐरोली 13

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
breaking marathi CIDCOs 106 residential plots sale Navi Mumbai latest updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: breaking marathi CIDCO 106 residential plots sale Navi Mumbai latest updates