
राज्यात कोविडचा नवा स्टेन आढळला असून त्याची दखल घेऊन मुंबईतील 90 जणांचे नमुनेही तपासण्यात येत आहेत
मुंबई : राज्यात कोविडचा नवा स्टेन आढळला असून त्याची दखल घेऊन मुंबईतील 90 जणांचे नमुनेही तपासण्यात येत आहेत. महापालिकेने 90 कोविड बाधितांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
अकोला आणि अमरावती जिल्ह्यात कोविडचा नवा स्टेन आढळला आहे.हा स्टेन वेगाने पसरण्याची भिती असून तसेच शरिरातील प्रतिपिंडांनाही( ॲन्टीबॉडी) दाद देत नाही.‘मुंबईत अशा प्रकारचा स्टेन आढळलेला नाही.मात्र,90 जणांचे नमुने पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे’. असे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.अमरावती मधील 700 नमुन्यांपैकी 350 नमुन्यांमध्ये हा स्टेन अाढळला होता.तसेच या नव्या पध्दतीच्या विषाणूमुळे रुग्णाला वेगाने न्यूमोनियाची लागण होत आहे.त्यामुळे हा नवा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ मानतात.त्यातच मुंबईसह राज्यतील काही जिल्ह्यात पुन्हा कोविडचा प्रसार अधिक वेगाने होत आहे.
--------------------------------------
( Edited by Tushar Sonawane )
breaking marathi covids new stain was found in maharashtra coronavirus update