अवघ्या तिशीत स्तनाचा कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

द पिंक इनिशिएटिव्ह संस्थेच्या पाहणीतील धक्कादायक वास्तव

मुंबई- स्तनाला होणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरींप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत. सर्वाधिक रुग्ण तिशीतील असल्याने महिलांनी वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.

द पिंक इनिशिएटिव्ह संस्थेच्या पाहणीतील धक्कादायक वास्तव

मुंबई- स्तनाला होणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरींप्रमाणे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत. सर्वाधिक रुग्ण तिशीतील असल्याने महिलांनी वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.

"दी पिंक इनिशिएटिव्ह' या स्तन कर्करोगाच्या रुग्णांबरोबर काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या पाहणीत 2016 मध्ये स्तन कर्करोगाचे 1 लाख 30 हजार रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक रुग्ण तिशीमधील आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, 25 वर्षांपूर्वी दर 100 पैकी दोन रुग्ण 20 ते 30 वयोगटातील असत. सात रुग्ण 30 ते 40 वर्षे वयोगटातील आणि सर्वाधिक रुग्ण सत्तरी ओलांडलेले असत. आता हे चित्र उलट दिसू लागल्याने महिलांनी जास्त खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्तनांच्या कर्करोगाने होणारे मृत्यू पाचव्या क्रमांकावर आहेत. प्राथमिक अवस्थेत रोगाचे निदान झाले, तर योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे अनेक जीव वाचू शकतात; मात्र अनेकदा महिला याकडे दुर्लक्ष करतात किंवा टाळाटाळ करतात आणि आजार बळावल्याने त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू होतो.

स्तन काढून टाकण्यासाठी पतीची परवानगी
पूर्वी स्तनाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट होताच स्तन काढून टाकण्यासाठी पती नकार देत असत. बदलत्या काळानुसार हल्ली पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पती स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यास महिलांना मदत करतात, असे संस्थेचे म्हणणे आहे. काही भागांत स्तन कर्करोग झाल्यानंतर महिलांना घटस्फोट देण्याचे प्रकारही घडत आहेत.

ब्रेस्ट कन्झर्व्हेशन रुग्णांसाठी वरदान : डॉ. कुमार
स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या आजारानुसार त्यांना ब्रेस्ट कन्झर्व्हेशन सर्जरी (बीसीएस) हा चांगला पर्याय आहे. या शस्त्रक्रियेमध्ये ज्या भागात कर्करोग झाला आहे, तो भाग काढून स्तनाचा उर्वरित भाग तसाच ठेवला जातो. ही शस्त्रक्रिया महिलांना उपयुक्त ठरत असल्याचे संस्थेशी जोडलेले कर्करोगतज्ज्ञ डॉ. के. एम. कुमार यांनी सांगितले.

Web Title: Breast cancer

टॅग्स