पादचाऱ्यांचा जीव मुठीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

तुर्भे - सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा पोलिस ठाण्यासमोर बांधलेल्या अर्धवट पादचारी पुलामुळे येथे पादचाऱ्यांना अर्धा रस्ता जीव मुठीत घेऊन; तर अर्धा रस्ता पुलावरून ओलांडावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या पादचारी पुलाचे काम रखडले आहे. या पुलाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार याकडे पादचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची दमछाक होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना किमान १०-१५ मिनिटे थांबावे लागते. त्यानंतर धावत रस्ता ओलांडावा लागतो. लहान मुले व महिला सोबत असतील तर जास्त हाल होतात. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आघाडी सरकारने सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. रुंदीकरणाचे काम संपले नसतानाच खारघरमध्ये टोलनाका सुरू केला. आवश्‍यक ठिकाणी उड्डाणपूल आणि स्कायवॉक बांधले. तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळही पादचारी पूल बांधला आहे; मात्र पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.

नियोजन चुकले
सायन-पनवेल महामार्गावर हा स्कायवॉक बांधताना केलेले नियोजन चुकले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गिकेपर्यंतच स्कायवॉक बांधला आहे. यामुळे गावातून येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. अर्धा रस्ता ओलांडण्यासाठी ते पादचारी पुलाचा वापर करतात. येथे रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखे आहे. तुर्भे एमआयडीसीतील कामगारांना हा रस्ता ओलांडावा लागतो. दररोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर कामगारांची गर्दी असते. त्यामुळे येथे बिकट परिस्थिती निर्माण होते.

Web Title: Bridge planning wrong