कल्याणमध्ये नवीन पत्रिपुलाचे काम रखडले

रविंद्र खरात 
शनिवार, 22 डिसेंबर 2018

कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी दौऱ्यात उघड झाले आहे.<

कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी दौऱ्यात उघड झाले आहे.<

कल्याण शिळफाटा रोड रेल्वे लाईन वरील 104 वर्ष जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करत 18 नोव्हेंबरला तोडण्यात आला. तो तोडल्यानंतर एक महिन्यात काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने पुन्हा कल्याण डोंबिवलीकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे .

नागरिकांची नाराजी पाहता आज शनिवार (ता. 22) सकाळी साडे नऊच्या सुमारास आमदार नरेंद्र पवार यांनी रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अनिरुद्ध बोर्डे, अन्य अधिकारी ठेकेदार यांच्या समवेत रखडलेल्या नवीन पत्रिपुलाची पाहणी केली. यावेळी अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. नवीन पत्रिपुलाची डिझाईन ठेकेदाराने आयआयटी विभागाला मंजुरीसाठी पाठवला असून तेथून नवीन वर्षात 5 जानेवारी पर्यँत मंजुरी मिळाल्यावर रस्ते विकास महामंडळ ते डिझाईन रेल्वेकडे पाठविले जाईल, रेल्वे ने काही सूचना दिल्यास पुन्हा डिझाईन बदलून पुन्हा रेल्वेला दिला जाईल किंवा पहिल्याच फेरीत डिझाईन मंजुरीला अंदाजे एक ते दोन महिने कालावधी लागू शकतो. रेल्वेने मंजुरी दिल्यावर प्रत्यक्ष मार्च एप्रिल 2019 ला कामाला सुरुवात होईल मात्र तेथे बांधकाम करताना 4 ते 6 मेगाब्लॉक लागतील आणि ते रेल्वे कधी देईल यावर त्या पुलाचे भविष्य असून या सर्व तांत्रिक अडचणी पाहता एक वर्ष अथवा त्याचा कालावधी पाहता मार्च-एप्रिल 2020 मध्ये नवीन पत्रिपुल उभा राहण्याची शक्यता आहे. 

रखडत असलेल्या नवीन पत्रिपुल आणि वाहतूक कोंडी मुळे नागरिकांची नाराजी त्यात अधिकारी वर्ग देत असलेल्या विविध प्रतिक्रिया बाबत आमदार नरेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त करत, राज्यात केंद्रात भाजपाची सत्ता आहे.  स्वतः मी आमदार आहे, अश्या वेळी आम्हाला या गोष्टी अधिकारी वर्ग का सांगत नाही असा सवाल करत हा पूल दोन पदरी का सहा पदरी का नाही असे प्रश्न ही अधिकारी वर्गाला केले. अधिकारी वर्गाची प्रतिक्रिया पाहता आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये तफावत असल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले असून रखडलेल्या नवीन पत्रिपुलाच्या कामाच्या मंजुरी साठी खासदार कपिल पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. नागरीकांना वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरात लवकर कामाला गती देण्याचा सल्ला यावेळी आमदार पवार यांनी अधिकारी वर्गाला दिला.

Web Title: bridge work pending in kalyan