घोडवली - पळसदरी पूल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मुंबई : घोडवली ते पळसदरी येथील पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. सध्या कोणत्याही क्षणी हा पूल पडण्याची शक्‍यता असल्याने प्रवासी धास्तावले आहेत. खालापूर हद्दीत घोडवलीमार्गे कर्जत पळसदरी रस्त्यावर असलेला छोटा पूल संरक्षक कठड्याविना धोकादायक झाल्याचे वृत ‘सकाळ’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले होते. 

मुसळधार पावसामुळे पुलाची वाताहत झाली आहे. पाण्याखाली असलेल्या पुलावरील पाणी पावसाचा जोर कमी झाल्यावर ओसरले. मात्र, आधीच कमकुवत झालेला पूल पावसाच्या तडाख्यात आणखीन कमकुवत झाला आहे. पुलावरील डांबर व क्राँक्रीट वाहून गेले आहे. सध्या पूल धोकादायक अवस्थेत असून अपघात होण्यापूर्वी दुरूस्ती करावी; तसेच नवीन पर्यायी पुलासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.

केळवली रेल्वेस्थानक तसेच कर्जतला जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असून या पुलामुळे कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांचा वळसा वाचतो. 
- संजीवनी पिंगळे, घोडवली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bridges dangerous