esakal | Mumbai : खेळाडूंसाठी तरण तलाव खुले; महापालिकेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

swimming tank

Mumbai : खेळाडूंसाठी तरण तलाव खुले; महापालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूना सराव करण्यासाठी तरणतलाव खुले करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, नियमभंग झाल्यास साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

जलतरणाच्या विविध स्पर्धा पुढील काही दिवसात होणार आहेत. मात्र,मुंबईसह राज्यातील तरण तलाव खुली नसल्याने जलतरण पट्टूंमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे राज्य सरकारने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या जलतरण पट्टूंना सरावाची सशर्त परवानगी दिली आहे.

तरणतलावतील कर्मचाऱ्यासह 18 वर्षांवरील खेळाडूंनी कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पुर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. तर,18 वर्षांखालील खेळाडूंनी पालकांचे समंतीपत्रासह, वयाचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. या अटींवर राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

loading image
go to top