सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला 'या भागातून सुरुवात

सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला 'या भागातून सुरुवात

मुंबईः कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव समजून घेण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. ICMRच्या मार्गदर्शक तत्वानुसार १८ वर्षांवरील व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात येतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सूचनेनुसार, पालिकेनं हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संक्रमणाची तीव्रता समजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यानुसार आजपासून माटुंगा, चेंबूर आणि दहिसर परिसरांत दुसऱ्या टप्प्यातील सेरो सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या भागातील झोपडपट्टया आणि वसाहतींमध्ये १३ ते २८ ऑगस्ट या काळात सेरो सर्वेक्षण करण्यात येईल.

ICMR च्या सुचनेनुसार, माटुंगा (एफ-उत्तर), चेंबूर (एम-पश्चिम) आणि दहिसर (आर-उत्तर) या भागातील झोपडपट्टया आणि वसाहतींमध्ये १३ ते २८ ऑगस्ट या काळात सेरो सर्वेक्षण करण्यात येईल. 

या तिन्ही भागांतील झोपडपट्टय़ांमध्ये १३ ते २० ऑगस्टदरम्यान, तर वसाहतींमध्ये १७ ते २८ ऑगस्टदरम्यान सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान दहिसरमधील इमारतींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचा अहवाल तातडीनं उपलब्ध व्हावा यादृष्टीनं आखणी करण्यात आली आहे. साधारण एका आठवडय़ात अहवाल मिळू शकेल.

सर्वेक्षणात माहिती आणि तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांच्या नोंदी दोन स्वतंत्र अ‍ॅपमध्ये करण्यात येणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील कोरोनाच्या संक्रमणाचा कल समजून घेत त्यावर नियंत्रण मिळवणं हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण प्रथम मूलभूत स्वरुपाचे आहे. त्यानंतर या सर्वेक्षणाच्या आणखी फेऱ्या होतील.

यापूर्वी धारावी, कुर्ला, देवनार, साकीनाका, कांदिवली पूर्व आणि पश्चिम परिसरातील पालिकेनं सेरो सर्वेक्षणासाठी ५०० जणांच्या रक्ताचे नमुने घेतलेत. या सर्वेक्षणातून सर्वसाधारणपणे लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगिलिक फैलाव समजून घेण्यास मदत होणार आहे. या सर्वेक्षणात १० हजार रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. 

नीती आयोग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च, मुंबई’ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) आणि बिगर शासकीय संस्था यांचं पथक हे सर्वेक्षण करणार आहे.  हे पथक नागरिकांच्या घरी भेटी देऊन माहिती आणि रक्त नमुने गोळा करतात. कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळा, तसंच फरिदाबाद येथील ट्रान्सलेशलन हेल्थ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये हे नमुने पाठविण्यात येतील.  तेथे नमुन्यातील प्रतिपिंडांचे निदान करण्यात येईल.

रक्तात वाढ झाल्याचं स्पष्ट होणे म्हणजे संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट होईल. ICMRच्या मार्गदर्शक तत्वानुसार रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रक्तातील अँटीबॉडीजची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती समोर आल्यानंतर कोरोनाचा फैलाव रोखणं आणि नियंत्रण मिळवणं याआधीच्या पद्धतीत बदल करणे शक्य होईल, असं पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं.

Brihanmumbai Municipal Corporation Second sero survey Covid 19 from Aug 13 Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com