Prithviraj Chavan : ‘खासदार ब्रिजभूषण यांना अटक व्हावी' - पृथ्वीराज चव्हाण

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर
Brijbhushan should be arrested Prithviraj Chavan Allegations made by women wrestlers against Brijbhushan Singh are very serious
Brijbhushan should be arrested Prithviraj Chavan Allegations made by women wrestlers against Brijbhushan Singh are very seriousEsakal

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, की ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत.

यातील एक ‘एफआयआर’ पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही ब्रिजभूषण यांना अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत, हे त्याहून गंभीर आहे. महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अद्याप कारवाई होत नसल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजपच्या महिला नेत्यांनी या प्रकरणी पीडित खेळाडूंना समर्थन दिले पाहिजे.

Brijbhushan should be arrested Prithviraj Chavan Allegations made by women wrestlers against Brijbhushan Singh are very serious
Wrestler Protest : जनताच इंग्रजांप्रमाणे सरकारला पळवून लावेल... महावीर फोगाट म्हणाले मुली कुस्तीच सोडतील

कलाकार, खेळाडूंनी पुढे यावे

महिला कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी देशभरातून राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती पुढे येत असताना बॉलिवूडमधील कलाकार व इतर खेळाडूंनीही पुढे येऊन महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com