किरकोळ वादातून भावाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - किरकोळ वादातून भावानेच लहान भावाची हत्या केल्याचा प्रकार वरळी येथे बुधवारी घडला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

मुंबई - किरकोळ वादातून भावानेच लहान भावाची हत्या केल्याचा प्रकार वरळी येथे बुधवारी घडला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

दिनेश गुप्ता (वय 41) असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी पुष्पा हिच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिनेशचा भाऊ राजेश (48) याला अटक केली. दिनेश आणि राजेश दोघांचीही कुटुंबे वरळी मद्रासवाडीतील मोतीलाल नेहरूनगर येथे एकाच घरात राहतात. दिनेशचा दुधाचा व्यवसाय होता. त्यामुळे अनेकजण त्याला भेटायला घरी यायचे. मात्र राजेशला हे आवडायचे नाही. यातून दोघांमध्ये यापूर्वी अनेकवेळा भांडण झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीही याच मुद्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी दिनेशने राजेशच्या अंगावर पाणी ओतले. संतापलेल्या राजेशने पुऱ्या तळण्याच्या झाऱ्याने दिनेशच्या मानेवर मारले. त्यात दिनेश जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: Brother murder in mumbai

टॅग्स