डोंबिवलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बसपाची महारॅली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

डोंबिवली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बसपाच्या वतीने प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात महारॅलीचे आयोजन केले होते. युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर व युगंधर किरतकर देखील कार्यकर्त्या सह या रॅलीत सहभागी झाले.

डोंबिवली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बसपाच्या वतीने प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात महारॅलीचे आयोजन केले होते. युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर व युगंधर किरतकर देखील कार्यकर्त्या सह या रॅलीत सहभागी झाले.

महाराष्ट्र नगरमधील कार्यालयापासून रॅलीस सुरुवात झाली. काल आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कल्याण- डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर डोंबिवलीत आंबेडकरी जनतेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बसपाच्या रॅलीत असंख्य कार्यकर्ते निळ्या झेंड्याखाली एकवटले होते. शेकडो मोटरसायकल, शेकडो कार तितक्याच रिक्षा महारॅलीत सहभागी झाल्या होत्या. डोंबिवलीच्या महाराष्ट्र नगरमध्ये मनसेचे विभागप्रमुख विजय शिंदे यांनी रॅलीचे स्वागत करुन दयानंद किरतकरांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर समाजिक संस्थेने किरतकरांचे स्वागत केले. डोंबिवलीतील गोपी टाँकीज, फुले रोड, गांधी रस्ता, कोपर पूल, आयरे रोड , बालभवन, इंदिरा चौक, फडके रोड , बावन चाळ, शहराच्या या भागात जयभीमच्या घोषणा देत रॅलीतल्या कार्यकर्ते यांनी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी किरतकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस वंदन करुन आंबेडकरी जनतेस जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. या महारॅलीत रवीकिरण बनसोडे, विक्रम मोठे, संजीव इंगळे, महिंद्रा जाधव, राजेश कासारे, सुरेश कुशाळकर, रवी बागुल, लता मोहिते, अजित कदम, राम सुंदर, संजु पवार, संध्या मोटे, सारिका इंगळे, वर्षा भास्कर सहभागी झाले होते.

Web Title: bsp bike rally in dombiwali