फसवणुकीप्रकरणी बिल्डरला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - पुनर्वसन प्रकल्पात घर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी मोहनकुमार सुवर्णा (वय 59) या बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. सात कोटी सहा लाख रुपये लुबाडल्याप्रकरणी "मोफ्फा' कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 29 तक्रारदार पुढे आले असून 20 टक्‍क्‍यांहूनही अधिक रक्कम घेऊन त्यांना घर न दिल्याचा आरोप आहे.

चंद्रकांत कृष्णा शेट्टी हा या प्रकरणातील मुख्य तक्रारदार आहे. त्याच्यासह एकूण 29 तक्रारदार पुढे आले आहेत. त्यांची एकूण सात कोटींची फसवणूक झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तक्रारीनुसार, सुवर्णा हा चेंबूर येथील रहिवासी असून तो मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीचा संचालक आहे. त्याच्यामार्फत घाटकोपर येथील "राधा माधव' पुनर्वसन प्रकल्पात विक्रीस उपलब्ध जागेत घरे देण्याबाबत लेखी करार करून तक्रारदारांकडून 20 टक्‍क्‍यांहून अधिक रक्कम घेण्यात आली, पण घर मिळाले नाही. अखेर त्यांनी तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी सुवर्णा याच्यासह अहमद अली खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेने सुवर्णाला अटक केली. खान याने अटकपूर्व जामीन मिळवला आहे. 2010 ते 2013 या कालावधीत ही फसवणूक झाली असून आतापर्यंत सहा बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: builder arrested by cheating