Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Businessman Avinash Bhosele

Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच अविनाश भोसलेंच्या याचिकेवरील सुनावणी ६ जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे जवळपास एक वर्षापासून कोठडीत आहेत. २६ मे रोजी त्यांनी पहिल्यांदा सीबीआयने अटक केली होती, यस बँक आणि डिएचएफएल घोटळा प्रकरणात त्यांना सीबीआयने अटक केली होती. काही अनियमीत कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. ईडीने मनी लाँड्रींगच्या आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हापासून अविनाश भोसले हे कैदेत आहेत.

अविनाश भोसलेना जवळपास वर्षभरापासून जामीन मिळालेला नाहीये. याचप्रकरणी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान जून पर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केल्याने अविनाश भोसलेंना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये.

टॅग्स :mumbai high court