बिल्डरांविरोधात आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - भाडेकरूंचे प्रश्‍न सोडवण्यासाठी "रेरा' कायदा लागू करा, विकासाच्या जागेवरच ट्रान्झिट कॅम्प उभारण्यात यावा, या मागण्यांसाठी बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली राहत्या घरातून बेघर केलेल्या रहिवाशांना भाडे नाकारणाऱ्या विकसक आणि त्यांना पाठीशी घालणारी सरकारी यंत्रणा यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुनर्विकासाच्या नावाखाली हक्काचा निवारा विकसकांनी हिरावलेली मुंबईत एक लाख 25 हजार कुटुंबे आहेत. या झोपडी, चाळीत राहणाऱ्या नागरिकांना विकसकाने कित्येक महिने भाड्याची रक्कम दिलेली नाही. वरळी नाका येथील लाल चाळीतील 67 रहिवाशांना दोन वर्षांपासून विकसकाने भाडे दिले नसल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title: builder oppose agitation warning prakash narvekar