Mumbai building collapse : कोसळलेली इमारत म्हाडाची; मदतकार्य सुरु

Mumbai
Mumbai

मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील जिर्ण झालेल्या केसरबाग या चार मजली इमारतीचा भाग आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 12 लोक दगावल्याची तसेच 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती बचाव यंत्रणांनी दिली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल असुन तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. 

भेंडी बाजारच्या जवळ असलेल्या तांडेल मार्गावर ही चार मजली इमारत होती. हा मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असुन त्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा येत आहे. ही इमारत कोसळली तेव्हा परिसरातील इतर इमारतींना देखील हादरा बसला होता. त्यामुळे कौसर बाग इमारतीच्या शेजारील इतर इमारतीही रिकाम्या करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती यंत्रणांनी दिली. या अपघातात १२ लोक दगावल्याची शक्यता असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

या परिसरात अशा अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यासंदर्भात वारंवार मागणी करुनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी केला आहे. ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असल्यामुळे तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच रुग्णवाहिका पोहोचण्यास देखील अडचण येत आहे. म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या या इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती; त्याची जबाबदारी एका विकसकाकडे देण्यात आली होती, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. भेंडी बाजार येथे मुंबईतील सर्वात मोठी समुह विकास योजना राबविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com