काल इमारत रिकामी केली अन् आज पत्त्यांसारखी कोसळली!

अजय दुधाणे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कालच सर्वांना बाहेर काढलेलं असल्यानं यात कुणालाही इजा झाली नाही, मात्र रहिवाशांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. सध्या  संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिकामा करण्यात आलाय. दरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेच्या सतर्कते मुळे मोठी जीवितहानी टळली.

उल्हासनगर : पाच मजली महक इमारत पत्त्यांसारखी कोसळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. उल्हासनगर महानगरपालिकेने कालच ही इमारत खाली केल्याने पालिकेच्या सतर्कते मुळे मोठी जीवितहानी टळली.

महक अपार्टमेंट असे या इमारतीचं नाव होते. उल्हासनगरच्या कॅम्प 2 भागात असलेली ही इमारत काल सकाळी झुकली होती. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाने काल सकाळीच ही इमारत पूर्ण रिकामी करत सील केली होती. या इमारतीत 31 कुटुंब राहत होते, त्यात एकूण 100 नागरिक राहत होते. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास अचानकपणे ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली.

कालच सर्वांना बाहेर काढलेलं असल्यानं यात कुणालाही इजा झाली नाही, मात्र रहिवाशांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. सध्या  संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिकामा करण्यात आलाय. दरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेच्या सतर्कते मुळे मोठी जीवितहानी टळली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Building collapsed ta Ulhasnagar