सीएसएमटीची इमारत सौरऊर्जेने उजळणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - हरित क्रांती प्रकल्पांतर्गत जागतिक वारसा असलेली सीएसएमटीची इमारत सौरऊर्जेने उजळणार आहे. तसेच मध्य रेल्वेचे कार्यालय असलेल्या इतर इमारतींनाही यापुढे सौरऊर्जेपासून निर्मित विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या विजेची मोठी बचत होणार आहे. याआधी मध्य रेल्वेने नेरळ, माथेरान, आसनगाव, मानखुर्द या स्थानकांत हा प्रकल्प राबवला आहे. 

मध्य रेल्वेने केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मेसर्स श्री पवन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसोबत 5 रुपये 18 पैसे प्रतियुनिटने वीजपुरवठा करण्याबाबत करार केला आहे. या करारानुसार कंपनी सहा मेगावॉट ऊर्जेची निर्मिती करेल. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ही वीजनिर्मिती होणार आहे. तिचा वापर मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेतील सहा स्थानकांत करण्यात येईल. त्यात सीएसएमटी टर्मिनस, मनमाड, भुसावळ आणि नागपूर स्थानकांचा समावेश आहे. 

1 कोटी 29 लाख 30 हजार -  युनिट वीजनिर्मिती 
25 वर्षे  - वीजपुरवठा कराराचा कालावधी 
1 कोटी 50 लाख  - वीज बिलातील बचत 

Web Title: The building of CSMT will be powered by solar energy