प्रभादेवीतील इमारतीच्या 33 व्या मजल्यावर आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - प्रभादेवीतील "ब्यू मॉंन्ड' या इमारतीच्या 33व्या मजल्यावर बुधवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीतील 95 रहिवाशांची सुटका केली. आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अप्पासाहेब मराठा मार्गावरील या इमारतीच्या 33 व्या मजल्यावर दुपारी 2 च्या दरम्यान आग लागली. काही वेळांतच ती 32 व्या मजल्यावर पोचली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेतली. ते घटनास्थळी पोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाचे 12 बंब आणि पाण्याच्या आठ टॅंकरच्या साह्याने जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते; मात्र वाऱ्यामुळे आग अधिकच भडकत असल्याने त्यात अडचणी येत होत्या. सायंकाळी 7 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आग विझवताना हरिश्‍चंद्र रावराणे (वय 54) आणि शिवाजी आचरेकर (53) हे दोन जवान किरकोळ जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

या आगीत इमारतीतील अनेक प्लॅट्‌सचे मोठे नुकसान झाले आहे. या इमारतीच्या 32 व 33 व्या मजल्यावर हरीश वाभियांनी यांचे पेन्ट हाऊस आहे.

सेलिब्रिटींचे वास्तव्य
या इमारतीत अनेक सेलिब्रिटी, तसेच उद्योजकांचे वास्तव्य आहे. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा प्लॅट, तसेच कार्यालय आहे. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: building fire