ताज हॉटेलजवळील इमारतीला आग

मुंबई - कुलाबा येथे चर्चिल चेंबर इमारतीला रविवारी लागलेल्या आगीत जखमी नागरिकांना दवाखान्यात नेताना अग्निशामक दलाचे जवान.
मुंबई - कुलाबा येथे चर्चिल चेंबर इमारतीला रविवारी लागलेल्या आगीत जखमी नागरिकांना दवाखान्यात नेताना अग्निशामक दलाचे जवान.

मुंबई - गेट वे ऑफ इंडियाजवळील ताजमहाल हॉटेलच्या बाजूला असलेल्या चर्चिल चेंबर इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आज दुपारी ही भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

कुलाबा येथील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी आग लागली.  या घटनेची माहिती कळताच  अग्निशामक दलाने धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. या वेळी १४ जण इमारतीमध्ये अडकले होते.

शर्थीच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात दलाला यश आले. श्‍याम अय्यर (वय ५४) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर युसूफ पूनावाला (वय ५०) गंभीर जखमी असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच अग्निशामक कर्मचारी बरमर संतोष पाटील जखमी झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com