उल्हासनगरमध्ये पाच मजली इमारत झुकली

Ulhasnagar.jpg
Ulhasnagar.jpg

उल्हासनगर : आज सकाळी एक पाच मजल्याची इमारत झुकल्याने फ्लैटचे दरवाजे आपोआप जॅम झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या अनपेक्षित घटनेने जीव घाबरलेल्या रहिवाशांनी फोनाफोनी केल्यावर पालिका आणि अग्निशमन दलाने रहिवाशांना बाहेर काढून 31 फ्लैट खाली केले आहेत.

महक ही 5 मजली इमारत उल्हासनगरातील कॅम्प नंबर 3 मधील फर्नीचर बाजारपेठेच्या लिंकरोडवर असून त्यात 31 फ्लैट आहेत. पप्पू कलानी यांच्या राजवटीतील काळात ही इमारत उभारण्यात आली आहे. पालिकेने जाहिर केलेल्या अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नसल्याने नागरिक गुण्यागोविंदाने निश्चिन्तपणे राहत होते. मात्र सकाळच्या सुमारास ही इमारत झुकल्याने फ्लैट धारकांचे दरवाजे जॅम झाले. अनेकदा प्रयत्न करूनही दरवाजे उघडत नसल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी फोनाफोनी केली.

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानव्ये सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी धाव घेऊन जॅम झालेले दरवाजे उघडून 31 फ्लैट मधिल रहिवाशांना बाहेर काढून इमारत खाली केली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात बेघर होण्याची आणि नातलगांच्या घरात आश्रय घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

इमारत सुरक्षित आहे की नाही यासाठी महापालिकेच्या वतीने स्ट्रक्चर ऑडिट करून झुकलेली महक ही इमारत व्यवस्थित किंबहुना सुरक्षित आहे की नाही हा अहवाल बघून आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com