दाऊदशी संबंधित इमारतीवर हातोडा?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मुंबई - डोंगरीतील डिलिमा स्ट्रीटवरच्या "राबियाबाई बिल्डिंग' या आठ मजली बेकायदा इमारतीवरील कारवाईला शुक्रवारपासून सुरवात झाली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत असून, ही इमारत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाची असल्याचे बोलले जाते.

महापालिकेने काही महिन्यांपासून अतिक्रमणांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार अतिक्रमणनिर्मूलन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. ही इमारत प्लॉट क्रमांक 136 वर असून, तिचा स्लॅब तोडण्यास सुरवात झाली आहे. या इमारतीशी दाऊद किंवा त्याच्या हस्तकांचा संबंध आहे काय, असे विचारल्यावर सहायक आयुक्त उदय शिरूरकर यांनी त्याबाबतची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले. मनुष्यबळाच्या उपलब्धतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Building related to Daood demolished?