नवीन इमारत रखडल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना भोगाव्या लागतातयेत मरणयातना 

भगवान खैरनार
मंगळवार, 17 जुलै 2018

फळाही ओला दरवाज्यातून पाणी खिड्कीतून पाण्याचे शिंतोडे याच खोलीत जेवायचे झोपायचे अन शिक्षणही याच खोलीत घ्यायचे, ही स्थिती पाहून वाटेल कि एखाद्या गुरांच्या गोठ्याचे वर्णन आहे.

मोखाडा - कुठे पत्रेच फुटलेत तर कुठे पत्र्यातुन पाणी झिरपतेय यामुळे फरशीवर पाणी साचलय त्यातच कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे तिथे तुटक्या मुडक्या पत्र्याच्या पेट्या कोपऱ्यात सरकवकलेल्या पहील्याच ओल्या झालेल्या खोल्यात वर कपडे सुकवायचे बॅगाला भिंतीला लटकवायाच्या अन हो भिंतीही चिंब ओल्या त्यामुळे फळाही ओला दरवाज्यातून पाणी खिड्कीतून पाण्याचे शिंतोडे याच खोलीत जेवायचे झोपायचे अन शिक्षणही याच खोलीत घ्यायचे, ही स्थिती पाहून वाटेल कि एखाद्या गुरांच्या गोठ्याचे वर्णन आहे. पण नाही ही विदारक स्थिती आहे मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ आश्रमशाळेच्या वर्ग खोखोल्यांची, याहीपेक्षा भयंकर म्हणजे या मुलांसाठी हक्काच्या इमारतीचे काम या गावात चालु आहे .मात्र पाच वर्ष होवूनही ते पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्याना मरनयाताना भोगाव्या लागत असल्याचे विदारक वास्तव आहे.

जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत 30 शासकीय आश्रमशाळा असून त्यामधील 13 आश्रमशाळेची नवीन इमारतींचे कामे सन 2013 पासून सुरू झाली आहेत. दरम्यान, जवळपास सर्वच्या सर्व तयार झाल्या मात्र यातील सुर्यमाळ आणि पळसुंडा या दोन्ही आश्रमशाळेचे काम ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्या चालढकल कारभारामुळे रखडले आहे. सुर्यमाळ आणि पळसुंडा येथील आश्रमशाळा नवीन इमारतीं च्या कामाला 5  वर्षचा कालावधी उलटूनही ही कामे आजमितीस अर्धवट स्थितीत आहेत.

या कामांची निर्धारित मुदत संपलेली आहे. यामुळे जुन्याच इमारतींवर दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर पैसे खर्च होत असूनही आजघडीला दोन्ही आश्रमशाळेची स्थिती पाहील्यास अक्षरशः गुरांच्या गोठ्यापेक्षाही भयाण वास्तव याठीकाणी आहे. 

550 चा पट असलेली सुर्यमाळ शाळा येथे 1 ते 12  चे वर्ग आहेत. यासाठी असलेल्या 10 वर्ग खोल्यात, एकही खोली अशी नाही कि जी गळत नाही. यामुळे फरशीवर अक्षरशः पाणी साचतय त्याच परीस्थिती येथील विद्यार्थी गादी टाकून पाण्यात झोपतात तिथेच जेवतात तिथेच शिक्षण अन तिथेचे अभ्यास. अभ्यासाठी एवढ्या मोठ्या खोलीत एक बारीकशा दिवा एकुणच काय तर शैक्षणिक वातावरणाचा लवलेशही नसलेल्या तुटक्या मोडक्या वर्ग खोल्यात जिथे सर्व सामान्य माणूस उभा राहु शकत नाही अशा परीस्थितीत येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि याला जबाबदार फक्त प्रशासकीय हलगर्जीपणा आहे असे चित्र आहे यामुळे याला जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
 
विशेष बाब म्हणजे, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्याच खात्याने निधी उपलब्ध करून देऊनही वेळेत आश्रमशाळा इमारती चे कामे पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना जनावरांसारखे जिवन जगावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत.

mokhada

आमच्या गावातील आश्रमशाळेत विदारक परीस्थिती असून गेल्या पाच सहा वर्षापासून कासवगतीने काम चालु आहे यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवाच काही बर वाईट झाल तर या इमारतीच्या हलगर्जी करणाऱ्याना जबाबदार धरावे. - विष्णु हमरे ग्रामस्थ, सूर्यमाळ 

या आश्रमशाळेचे काम रखडलेलेतर आहेच मात्र याच ईमारती शेजारी असलेल्या वस्तीगृहाचे काम अतिशय निकृष्ट असून याला केलेला प्लास्टर हातने पडत आहे याशिवाय आत्ताच हे पिलेर वाकलेले आहेत यामुळे हे पाडून पुन्हा नवा बांधावा अन्यथा आम्ही ग्रामस्थ बोगस काम करु देणार नाही.
 - संजय हमरे ग्रामपंचायत सदस्य सूर्यमाळ 

या बांधकामाच्या सुधारीत प्रस्ताव पाठवला असून त्यामुळे थोडा उशिर झाला मात्र हे काम तात्काळ पुर्ण करण्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे दुसरा मुद्दा निकृष्ट बांधकामाचा तर याबाबत संबंधित विभागाला सुचना देण्यात येतील. - अजित कुंभार प्रकल्प अधिकारी ,जव्हार

Mokhada

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The building of tribal student hostel is in bad condition at Mokhada