कोसळलेला भाग बेकायदा

केसरबाई इमारत दुर्घटना
केसरबाई इमारत दुर्घटना

 
अनिश पाटील :सकाळ वृत्तसेवा 

मुंबई : केसरबाई इमारतीचा कोसळेला भाग बेकायदा असल्याची माहिती पुढे आली आहे. 30 वर्षांपूर्वी बेकायदा भाग उभारण्यात आला असून त्यातील मूळ भाडेकरूंनी घर रिकामी केल्यानंतर तेथे पोटभाडेकरू ठेवले असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. 

कोसळलेला तीन मजली भाग 1985 ते 87 मध्ये बांधण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी सकाळी तो कोसळला. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

महापालिकेने केसरबाई इमारत 2017 मध्ये धोकादायक ठरवली होती. मात्र, आज जो भाग कोसळला तो बेकायदा असल्याची माहिती पुढे आली आहे. बेकायदा भागही वर्षभरापूर्वी मूळ भाडेकरूंनी रिकामा केला होता. मात्र, त्यांनी पोटभाडेकरू ठेवले होते. 

पुनर्विकासाची प्रक्रिया कागदावरच 
95 वर्षे जुन्या केसरबाग इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इमारतीतील मूळ रहिवाशांनी ती इमारत रिकामी केली असल्याचे सांगण्यात आले. केसरबाई इमारतीच्या मूळ रहिवाशांनी दीड वर्षापूर्वी इमारत रिकामी केली होती. तेव्हापासून ही 52 कुटुंबे दुसरीकडे भाड्याने राहत आहेत. मात्र, इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com