सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी बुक्‍टू मैदानात 

सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी बुक्‍टू मैदानात 

मुंबई : मुंबई विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. अत्यल्प वेतन, सुविधांचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सुरक्षा रक्षक त्रस्त झाले आहेत. दिवस-रात्र विद्यापीठाची सुरक्षा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे प्रश्‍नांसाठी प्राध्यापकांची बुक्‍टू संघटना मैदानात उतरली आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. 2) फोर्ट कॅम्पसमध्ये एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. 

मुंबई विद्यापीठात गेल्या 20 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांना आवश्‍यक असलेला गणवेशही स्वतः खरेदी करावा लागतो. गेल्या 15 वर्षांपासून विद्यापीठाच्या 145 कर्मचाऱ्यांना केवळ 9 हजार 600 रुपये मानधन देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे खासगी संस्थेमार्फत नियुक्त केलेल्या 60 सुरक्षा रक्षकांवर मुंबई विद्यापीठ महिन्याला 21 हजार रुपये खर्च करत आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांवर अधिकारीही अन्याय करत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. 

सुरक्षा रक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अखेर प्राध्यापकांच्या बुक्‍टो संघटनेने आवाज उठविला आहे. त्यानिमित्त 2 नोव्हेंबरला फोर्ट कॅम्पसमध्ये उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या सरचिटणीस मधु परांजपे यांनी सांगितले. 

महिला सुरक्षा रक्षकांची गैरसोय 
महिला सुरक्षा रक्षकांना गणवेश बदलण्यासाठी खोली नसल्याने त्यांना शौचालयांचा आधार घ्यावा लागत आहे, तर कलिना कॅम्पसमधील तीनही प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौक्‍यांची अवस्था बिकट झाली असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. 

आमरण उपोषणाचा इशारा 
1996 पासून हे सुरक्षा रक्षक विद्यापीठाची सेवा करत आहेत. विद्यापीठ त्यांना अत्यल्प वेतन देते, तसेच अनेकदा त्यांना सार्वजनिक सुट्ट्याही नसतात. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांना खासगी सुरक्षा रक्षकांप्रमाणे वेतन दिले जावेत, यासाठी मी पाठपुरावा करत आहे. सुरक्षा रक्षकांचा प्रश्‍न विद्यापीठाने सोडवला नाही, तर विद्यापीठात आमरण उपोषण करावे लागेल. 
- संजय वैराळ, माजी सिनेट सदस्य. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com