'बुलडोझर सरकार', अमृता फडणवीसांनी पुन्हा हिणवलं ठाकरे सरकारला

पूजा विचारे
Thursday, 15 October 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचलं आहे. सध्या राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे मंदिरं सुरु करण्यावरुन राजकारण सुरु आहे.

मुंबईः  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचलं आहे. सध्या राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे मंदिरं सुरु करण्यावरुन राजकारण सुरु आहे. यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरुनही वाद सुरु आहे. त्यात अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू उचलून धरली आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.  या टीकेला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं होतं. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांचं नाव घेत थेट शाब्दिक हल्ला केला होता. आमचं तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही", अशा शब्दांत त्यांना सुनावलं होतं. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला 'बुलडोझर सरकार' म्हणून हिणवलं आहे.

माझ्याकडे ना घर आहे, ना दार, मग काय उखडणार बबुलडोझर सरकार, असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांनी अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. 

विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या?, असा सवाल उपस्थित करतअमृता यांच्यावर टीका केली होती. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला काय करायचं ते शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. पण आम्ही सुसंस्कृत आहोत, असा टोला विशाखा राऊत यांनी हाणला होता.

अधिक वाचाः  पालघरमध्ये परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल, उभे पिके आडवी

 

तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी देखील ट्विटद्वारे अमृता फडणवीस यांना टोला लगावला. चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईंनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा, असे प्रत्युत्तर दिले होते. 

Bulldozer government Amruta Fadnavis again criticized the Thackeray government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bulldozer government Amruta Fadnavis again criticized the Thackeray government