पालघर - बुलेट ट्रेन सल्लामसलत बैठक रद्द

palghar
palghar

पालघर : मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प (बुलेट ट्रेन) च्या पर्यावरण विषयी सल्लामसलती च्या बैठकी करीत पुरेशा प्रमाणात व्यवस्था नसल्याने तसेच प्रकल्प विरोधी नागरिकांनी गोंधळ घातल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.

राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम यांच्या मार्फत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विषयक सल्लामसलतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात करणात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी यु.पी. सिंग, मुख्य व्यवस्थापक पंकज रोके, ऐ. के. गुप्ता, उप वन सवरक्षक नानासाहेब लडकत आदी मान्यवर उपस्थित आहे.

ही जनसूनावणी कोणत्या नियमांना धरून आयोजित करण्यात आली, या संदर्भात कोणत्या प्रचलित वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, या सुनावणीसाठी व्यस्था पुरेशा प्रमाणात आहे का? आदी प्रश्न उपस्थितांनी मांडले. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा, सुनावणी बंद करा आशा प्रकारची मागणी भूमिसेना, कष्टकरी संघटना, भूमिपुत्र बचाव संघर्ष समिती, मनसे कार्यकर्ते यांनी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

या विषयी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी या जन सुनावणी साठी पुरेशा प्रमाणात व्यवस्था नसल्याचे मान्य करून जिल्हाधिकारी यांनी ही बैठक रद्द केली.

बसण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पुरेशा प्रमाणात नसल्याने उपस्थित जमिनीवर बसले होते. या बाबत नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सह इतर मान्यवरांनी व्यसपीठासमोर खाली बसणे भाग पडले.

एकीकडे पर्यावरण विषयी सल्लामसलत बैठक सुरू असताना दुसरीकडे ही साधून प्रकल्प अधिकरी साखरे व देहने या दोन गावात जाऊन पोलीस संवरक्षणात सर्व्हेचे काम सुरू केले आल्याची माहीत पुढे आले. यामुळे आंदोलक संतप्त झाले त्यांनी नियोजन भवनात ठिय्या आंदोलन छेडले. अखेर अधिकारी वर्गाने आंदोलकांसमोर स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने या प्रकल्पाचे काम करू असे आश्वासन यु.पी. सिंग यांनी दिले.

नागरिकांची दिशाभूल करून सर्वेक्षण सुरू केल्याबद्दल जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन खुलासा करावा अशी मागणी केली. या प्रसंगी जिल्हाधिकारी येत नसल्याने महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com