बुलेट ट्रेनला आता शिवसेनाही आडवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ला शिवसेनेनं देखील आक्रमक विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ‘बुलेट ट्रेन कृती समिती’ने या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्याने भाजपसोबतचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनला सर्वाधिक विरोध होत आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ला शिवसेनेनं देखील आक्रमक विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ‘बुलेट ट्रेन कृती समिती’ने या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्याने भाजपसोबतचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनला सर्वाधिक विरोध होत आहे. त्यामुळे, ऐन पोटनिवडणुकीच्या काळात या मोर्चाचे आयोजन होत असल्याने भाजपची नाकेबंदी होऊ शकते. ३ जून रोजी मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून त्या अगोदरच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, प्रचारात स्थानिकांच्या विरोधाला बळ देत शिवसेनेनं बुलेट ट्रेनवरून भाजपची अडवणूक करण्याची रणनीती आखल्याचे हे संकेत आहेत. या अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ‘बुलेट ट्रेन’ला विरोध करत मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Bullet Train Shivsena