उसाटनेत उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bullock cart race

उसाटनेत उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा

डोंबिवली - ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर प्रथमच उसाटने गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील गाडा मालकांनी भाग घेत एकच धुरळा उडवून दिला. ही शर्यत पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी देखील गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील उसाटने गावातील गावदेवी मैदान येथे जय वाघोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत छकड्यांची शर्यत भरवण्यात आली होती.

उसाटने गावातील प्रवीण पाटील, सचिन भंडारी, निर्दोष पाटील यांनी आयोजित केलेल्या या शर्यतीत ठाणे, रायगड जिल्ह्यासह पालघर, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील गाडा मालक आपल्या छकड्यांसह सहभागी झाले होते. हे सामने पाहण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, राजेंद्र वारे, महाराष्ट्र राज्य बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके, पप्पू पाटील, अंबरनाथचे नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी उपस्थिती लावत शर्यतीचा आनंद लुटला. ग्रामस्थांनीही शर्यत पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Web Title: Bullock Cart Race In Usatnet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top