पोलीसांच्या कारवाईने बैलगाडी मालकांची पळापळ.

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पनवेल : बैलगाडी शर्यतीवर बंदी असुनही,ति झुगारुण आयोजीत करण्यात आलेली बैलगाडा शर्यत तळोजा पोलीसांनी उधळवुन लावली आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही पोलीसांच्या नकळत काही ठिकाणी बैलांच्या शर्यती आयोजीत केल्या जातात.

पनवेल तालुक्यातील पडघे गावात अशाच प्रकारच्या शर्यतीच आयोजन रविवारी (ता.27)  करण्यात आल होत्या. शर्यतींच्या सर्वप्रकारची तयारी पुर्ण झालेली होती. पनवेल बरोबरच शेजारच्या कल्याण, डोंबीवली, ठाणे, भिवंडी परीसरातील बैलगाडी मालक आपल्या बैलांसोबत शर्यतींच्या ठिकाणी पोहचले होते. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शौकिनांनी गर्दी केली होती.

दुपारी 2.30 च्या सुमारास सुरु होणार असलेल्या शर्यतींची कुणकुण तळोजा पोलीसांना लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांना पाहताच शर्यतीच्या ठिकाणी दाखल झालेल्या बैलगाडी मालकांची दानादान उडाली. त्या नंतर जिथे भेटेल त्या रस्त्याने आपले बैल घेवुन बैलगाडी मालक पसार झाल्याने पोलीसांच्या हाती काही लागलेल नाही. राज्यात बैलगाडी शर्यतीच्या न्यायालयीन बंदीला जवळपास चार वर्ष पूर्ण झाली आहे. बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी बैलगाडी मालकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र,  बैलगाडी मालकांना शर्यती सुरु होण्याची परवानगी मिळाली नाही. दरम्यान आजा आयोजीत करण्यात आलेल्या शर्यतींच आयोजन भाजपच्या एका नगरसेवकाने केली असल्याची चर्चा सर्वत्र होती. पोलीसांकडुन मात्र दुजोरा मिळु शकला नाही

Web Title: Bullockman owners escape with police action.